तुर्की आणि चीनमध्ये भूकंप   

इस्लामाबाद : पाकिस्तान, तुर्की आणि  चीन भूकंपाने हादरला आहे. १२ ते १३ मे दरम्यान पाकिस्तानमध्ये तीन भूकंपाचे धक्के बसल असून १५ मे रोजी तुर्कीमध्ये ५.२ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. १६ मे रोजी चीनमध्ये ४.५ तीव्रतेचा भूकंप झाला.
 
१२ मे रोजी पाकिस्तानला ४.६ तीव्रतेचा भूकंप झाला, तर १० मे रोजी सकाळी अनुक्रमे ४.७ आणि ४.० तीव्रतेचे सलग दोन भूकंप झाले. भूगर्भशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्र तज्ज्ञांच्या मते, हिमालयीन प्रदेशात टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे भूकंप झाले. यानंतर, १५ मे रोजी संध्याकाळी तुर्कीमध्ये शक्तिशाली भूंकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.२ एवढी मोजली गेली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्था मेहरने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपाचे हादरे तुर्कीची राजधानी अंकारामध्येही जाणवले. जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. बुधवारी सकाळी ग्रीसमधील फ्रायजवळ ६.१ तीव्रतेच्या भूकंपानंतर ही घटना घडली. चीनमध्ये ४.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला चीनमध्ये  १६ मे रोजी सकाळी ४.५ तीव्रतेचा भूकंप झाला होता. 

Related Articles